Accident News: नाशिक शहरात वेगवेगळ्या चार अपघातांत इतके जण ठार

Testing Button

I am promo text. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

नाशिक (प्रतिनिधी): शहर परिसरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन ठार तर एक जण जखमी झाले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे.

[wcpcsu id="666"]

अपघाताचा पहिला प्रकार फुलेनगरजवळ घडला. नामदेव गोविंद मौले (वय ५१, रा. स्नेहनगर, म्हसरूळ) हे १२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एम.एच.१५ बी.एफ.९३५७ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी फुलेनगर येथील बच्छाव हॉस्पिटलसमोर घसरल्याने ते जमिनीवर पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस नाईक गजेंद्र बरेलीकर यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[bsa_pro_ad_space id=1]

अपघाताचा दुसरा प्रकार गडकरी चौकाजवळ घडला. फिर्यादी जितेंद्र अनिल मोरे (रा. निवाणे, ता. कळवण) हे एम.एच.४१ एझेड १५७० या क्रमांकाची इर्टिका कार घेऊन जात असताना त्र्यंबक नाका येथे सिग्नल सुरु असल्यामुळे थांबले होते. त्यावेळी पाठिमागून आलेल्या एम.एच.२० व्हीएल ३८१८ या क्रमांकाच्या बसवरील चालक योगेश कैलास चव्हाण (रा. हर्सुल, ता.जि. औरंगाबाद) याने पाठिमागून कारला धडक दिली.

यावेळी कारमध्ये असलेली दिया सौरव जाधव (रा. क्रांतीनगर, मखमलाबादरोड) हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तर इतर तीन वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बिरारी करीत आहेत.